देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जलदगतीने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत देशभरात करोना रुग्णांचा आकडा १९०० वर पोहोचला असून मृतांचा आकडा ५५ वर पोहोचला आहे. देशभरातील लॉकडाऊनचा आजचा ९ वा दिवस असून आज देशभरात करोनाबाबत काय स्थिती आहे याबाबतचे हे लाइव्ह अपडेट्स….

Live अपडेट्स…

>> महाराष्ट्रात देशातील राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या ३३५ वर. महाराष्ट्रात एकूण मृतांचा आकडा १६ वर.

>> दिल्लीतील निझामुद्दीनमधील तबलीघी जमातीच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या एकूण ९३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट.

>> देशभरात करोनाग्रस्तांची संख्या १९०० वर पोहोचली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा आज नववा दिवस आहे.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर करोनाबाबत चर्चा केली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here