-विज सोशल मीडियावर सक्रीय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे बरेच फॉलोअर्स आहेत. नृत्याचे, सहकलाकारांसोबतचे, भटकंतीचे तसेच पती दीपक विज यांच्यासोबतच्या खास क्षणांचे फोटो, व्हिडिओ नेहमीच शेअर करत असतात. त्यांची प्रत्येक पोस्ट चाहत्यांना आवडते. मात्र यावेळी किशोरी यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टने रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकला.
किशोरी शहाणे यांची पोस्ट
किशोरी यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या गाडीला झालेल्या अपघाताचे फोटो शेअर केले. पवना लेक परिसरात गिरावण येथून येत असताना किशोरी यांच्या गाडीला हा अपघात झाला आहे. हे फोटो शेअर करताना किशोरी शहाणे यांनी लिहिले आहे की,’आमच्या गाडीला अपघात झाला आहे. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. देवाच्या कृपेने आम्हाला कुणालाही इजा झालेली नाही. जाको राखे साईया मार सके ना कोई.’ किशोरी शहाणे यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेन्ट केल्या आहेत. किशोर शहाणे आणि त्यांचे कुटुंबीय सुखरुप असल्याने चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
किशोरी या मराठी, हिंदी सिनेसृष्टी, नाट्यसृष्टी आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. किशोरी यांनी आतापर्यंत ७० पेक्षा अधिक मराठी, हिंदी चित्रपटांमधून तसेच टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. बिग बॉस मराठी या रिअॅलटी कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या. किशोरी शहाणे यांचे लग्न चित्रपट निर्माते दीपक विज यांच्याशी झाले असून, या दांपत्याला एक मुलगा आहे. दीपक विज यांनी ‘ऐका दाजीबा’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शनही केले आहे. किशोरी शहाणे यांनी परदेशातही शास्त्रीय नृत्याचे शो केले आहेत.