मुंबई : पॉवर स्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा द राइज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच दरम्यान अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर एक नवीन स्थान मिळवलं आहे. पुष्पा फेम अल्लू अर्जुनचे ट्विटरवर ६.५ मिलियन फॉलोअर्स आहेत, यावेळी अल्लू अर्जुनने दाक्षिणात्य सुपरस्टार थलैवी रजनीकांत यांनाही मागे टाकले आहे.

किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात, ट्रकने दिली धडक

अल्लू अर्जुनचे ट्विटरवर ६.५ मिलियन म्हणजेच ६५ लाख फॉलोअर्स आहेत. थलैवी रजनीकांत यांना ट्विटरवर ६.१ मिलियन म्हणजे ६१ लाख युझर्स फॉलो करतात. विशेष बाब म्हणजे अल्लू अर्जुन ट्विटरवर कोणालाही फॉलो करत नाह. एकाही कुटुंबातील व्यक्तीला किंवा स्टार्स, नेत्यांना तो फॉलो करत नाही. जर तुम्ही त्याची फॉलो करणाऱ्यांची संख्या पाहिली तर ती शून्य आहे. तर अल्लू अर्जुननंतर अमिताभ बच्चन, रकुलप्रीत सिंग, रश्मिका मंदान्ना आणि सामंथा प्रभू असे स्टार्स आहेत ज्यांचे युझर्स सर्वाधिक आहेत.

अल्लु अर्जुन

अल्लू अर्जुनचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स

अल्लू अर्जुन इन्स्टाग्रामवर देखील खूप सक्रिय आहे. (Allu Arjun Instagram Followers) इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर त्याला १६.२ दशलक्ष यूझर्स फॉलो करतात आणि तो फक्त पत्नी स्नेहा रेड्डीला फॉलो करतो. सुपरस्टार रजनीकांत इन्स्टाग्रामचा फारसा वापर करत नाहीत, त्यांनी इन्स्टावर फक्त एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांना ८२१ हजार युजर्स फॉलो करतात.

रजनीकांत

अल्लू अर्जुनचे फेसबुक फॉलोअर्स

अल्लू अर्जुनचे फेसबुकवर २१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तो फेसबुकवर राम चरण, वरुण तेज, चिरंजीवी, आर्य, साई धर्म तेज आणि त्याच्या काही फॅन पेजेससह २० लोकांना फॉलो करतो.

सुनील ग्रोवरच्या उपचाराची सलमान खानने घेतली जबाबदारी

तुम्हाला सांगतो की अल्लू अर्जुन त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे सध्या ट्रेंडमध्ये आहे. ‘पुष्पा’ने हिंदी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा गाठला असतानाच दक्षिणेतही या चित्रपटाने जबरदस्त व्यवसाय केला आहे. ‘पुष्पा’ OTT वरही रिलीज झाला आहे. त्याच्या कथेपासून ते अल्लू अर्जुनच्या दमदार अभिनयापर्यंत त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here