रुग्णालयातून आज सोडणार
सोमय्या यांना रुग्णालयात आणल्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढलेला होता; तसेच कंबर व मनगटात वेदना होत होत्या. त्यांच्या मणक्याचा आणि मनगटाचा ‘एक्स-रे’ काढण्यात आला. त्यात फ्रॅक्चर आढळले नाही. मात्र, त्यांच्या मनगटाला प्लास्टर करण्यात आले असून, त्यांना दोन दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यांना रविवारी (आज) घरी पाठवले जाईल, असे संचेती रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. पराग संचेती यांनी सांगितले.
घाबरून गप्प बसणार नाही : पाटील
‘शिवसेनेने पांघरलेला सभ्यतेचा बुरखा आता फाटला आहे. सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. भावना गवळी यांच्या प्रकरणात यवतमाळमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला म्हणून ते घाबरून घरी बसले नाहीत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात, तर सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच स्थानबद्ध करायचा प्रयत्न झाला; पण त्यामुळे ते घाबरून घरी बसले नाहीत. आजच्या शिवसैनिकांच्या हल्ल्यामुळेही सोमय्या घाबरून गप्प बसणार नाहीत. आम्ही कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देऊ,’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.