मुंबई: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं नुकतचं निधन झालं असून वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दिग्गजांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
- दीदींच्या निधनानं अवघा देश शोकाकुल
- भारताचा आवाज हरपला; केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वाहिली श्रद्धांजली
- दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
- दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभमीत अंत्यसंस्कार होणार
- अभिनेता अक्षय कुमारनं वाहिली लता दीदींना श्रद्धांजली
- युग संपले..लता दीदींच्या निधनानानंतर खासदार संजय राऊत यांचे ट्विट
- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोशल मीडियाद्वारे वाहिली श्रद्धांजली
- लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.