मुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज ५ फेब्रुवारी रोजीवयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्या ब्रीच कँडी इस्पितळात उपचार घेत होत्या. करोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने त्यांना तातडीने इस्पितळात हलवण्यात आले होते. अनेक दिवसांच्या उपचारांनंतर त्यांनी करोनावर मातही केली होती. यानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांची कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्यात आली होती. मात्र, आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना पुन्हा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. अखेर आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक अशी महत्त्वाची घटना आहे, ज्याचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम झाला.

दैवी स्वरांचे स्वर्गारोहण… गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

लता मंगेशकर यांचे लग्न झालेले नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आजपर्यंत त्यांनी लग्न का केलं नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊन गेला असेल. त्यामागची कहाणीही अतिशय हृदयद्रावक आहे. लतादीदींबद्दल असं म्हटलं जातं की त्याही कुणाच्यातरी प्रेमात पडल्या होत्या, पण लताजींची प्रेमकहाणी कधी पूर्णच होऊ शकली नाही. कदाचित याचमुळे त्या आजन्म अविवाहित राहिल्या.

लता मंगेशकर

त्यामुळे लता मंगेशकर यांचे लग्न होऊ शकले नाही

मीडिया रिपोर्टनुसार, लता मंगेशकर यांचे डूंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर खूप प्रेम होते. एवढेच नाही तर लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर हेही महाराजांचे मित्र होते. मात्र, हे प्रेम लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. दोघांच्या प्रेमात राजघराणं आलं. सामान्य घरातील कोणत्याही मुलीला आपल्या घरची सून करणार नाही, असं वचन राज यांनी आपल्या पालकांना दिल्याचं सांगितलं जातं. हे वचन राज यांनी मरेपर्यंत पाळलं.

त्याचवेळी, लतादीदींवरही त्यांच्या संपूर्ण घराची जबाबदारी होती, म्हणूनच त्यांनीही पुढे जाऊ कधी लग्न केलं नाही. पण लतादीदींप्रमाणे राजही आयुष्यभर अविवाहित राहिले. राज हे लतादीदींपेक्षा सहा वर्षांनी मोठे होते. त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. ते दीर्घकाळ बीसीसीआयचे सदस्यही होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here