आपल्या लाडक्या लतादीदींना निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर चाहत्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी पोलिसांकडून सुरक्षाव्यवस्थेचाही आढावा घेतला जात आहे. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार झाले होते. तेव्हाचा अनुभव लक्षात घेता प्रशासन आणि पोलिसांकडून शिवाजी पार्कवर व्यवस्था केली जात आहे.

महाराष्ट्रातील अनेक राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या शिवाजी पार्कच्या मैदानावरुन अर्थात शिवतीर्थावरुन लतादीदी अनंताच्या प्रवासाला निघणार आहेत.
हायलाइट्स:
- थोड्याचवेळात लता मंगेशकर यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर काढण्यात येईल
- लतादीदींचं पार्थिव त्यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल
थोड्याचवेळात लता मंगेशकर यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर काढण्यात येईल. त्यानंतर लतादीदींचं पार्थिव त्यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी ४.३० वाजता लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार आहे.
लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी करोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात लता मंगेशकर यांनी करोनावर मात केली होती. परंतु, त्यांच्या प्रकृतीमध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत होते. अलीकडेच त्यांची प्रकृती सुधारल्याने लता मंगेशकर यांची कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्यात आली होती. परंतु, शनिवारी दुपारच्या सुमारास लता मंगेशकर यांनी प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे लतादीदींना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. कालपासून राज ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : lata mangeshkar last cremation ceremoye last rites will happen at shivaji park mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network