पाकिस्तानी पत्रकाराला लता दीदींनी नेलं होतं देवघरात, सांगितलेलं कसं पडलं मंगेशकर आडनाव

काय होतं भांडणाचं कारण
मोहम्मद रफी यांची सून यास्मीन खालिद यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा Mohammed Rafi: My Abba – A Memoir या पुस्तकात केला आहे. लता दीदींसोबतच्या भांडणाबद्दल त्यांनी लिहिले की, ‘१९६० च्या सुरुवातीला या दोघांमध्ये भांडण झाले. हे भांडण झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात लोकप्रिय असलेल्या या दोन महान गायकांनी तीन वर्षे एकमेकांसोबत काम केले नाही.’
लता मंगेशकरांना आई स्थानी मानायचा सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टरसाठी गायलेलं एक सुरेख गाणं
यास्मिनने त्यांच्या पुस्तकात नमूद केले की, ‘या दोघांमध्ये जे भांडण झाले ते रॉयल्टीवरून झाले. दोघांनी जी गाणी एकत्र गायली होती त्यांची रॉयल्टी लता मंगेशकर यांना हवी होती. त्यांनी ही गोष्ट निर्मात्यांपुढे ठेवली. लतादीदींची इच्छा होती की मोहम्मद रफी यांनी त्यांना पाठिंबा द्यावा. परंतु रफी यांना ही गोष्ट मान्य नव्हती. रफी साहेबांच्या मते निर्माते जेव्हा गायकांना गाण्याचे पैसे देतात तेव्हा त्यांच्याकडून रॉयल्टी मागणे योग्य नाही.’

लतादीदींबरोबर काम न करण्याचा घेतला निर्णय
या गोष्टीवरून लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यात वाद झाला. यासंदर्भात लता मंगेशकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘रफीसाहेब म्हणाले होते, ‘मी लताबरोबर गाणे गाणार नाही.’ मी या गोष्टीला विरोध केला. त्यांना म्हटले की, ‘रफीसाहेब एक मिनीट तुम्ही जे म्हणतात ते चुकीचे आहे. मलाच तुमच्याबरोबर गायचे नाही.’ मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी देखील एका मुलाखतीमध्ये सांगितले की, या दोघांमध्ये निर्माण झालेला दुरावा मिटवण्याचे काम संगीतकार जयकिशन यांनी केले. त्यांच्यामुळेच या दोघांमध्ये पुन्हा मैत्रीचे नाते निर्माण झाले.