मुंबई- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचे आज मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात सकाळी ८.१२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. लतादीदींच्या निधनाने संपूर्ण देशातून शोक व्यक्त होत आहे.

Lata Mangeshkar: लता मंगेशकर मोहम्मद रफींसोबत झालेलं भांडण; तीन वर्ष केलं नाही एकत्र काम!

सुरांच्या सम्राज्ञी असलेल्या लतादीदींनी त्यांचे संपूर्ण आयुष्य संगीताला वाहिले होते. त्यांनी जवळपास सर्व भारतीय भाषांमधून गाणी गायली. त्यांनी गायलेल्या गाण्यांची संख्या सुमारे ३० हजार इतकी आहे. अर्थात त्यांचा हा संगीत प्रवास खूप मोठा आहे. या संगीत प्रवासामध्ये त्यांच्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले. लतादीदींनी बदलत्या काळाप्रमाणे काही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात केल्या होत्या. त्यातील एक गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांशी संवाद साधायच्या.

लता मंगेशकर

लता दीदींनी जेव्हा रेडिओसाठी पहिल्यांदा गाणे गायले, त्याला ८० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने एक खास पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली होती. या पोस्टमध्ये दीदींनी लिहिले होते की,’ देवाचा, पूज्य माई आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन १६ डिसेंबर १९४१ रोजी मी पहिल्यांदा रेडिओसाठी त्यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन दोन गाणी रेकॉर्ड करून आले होते. या गोष्टीला आता ८० वर्षे पूर्ण झाली. या ८० वर्षांत चाहत्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले, आशीर्वाद दिले. तुम्हा सर्वांचे हे प्रेम यापुढेही मला कायम मिळेल, अशी अपेक्षा आहे.’ असे म्हणत दीदींनी त्यांचा लहानपणीचा एक फोटोही शेअर केला होता.

पाकिस्तानी पत्रकाराला लता दीदींनी नेलं होतं देवघरात, सांगितलेलं कसं पडलं मंगेशकर आडनाव

चाहत्यांनी भरभरून व्यक्त केल्या प्रतिक्रिया

लता मंगेशकर यांनी हे सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यावर चाहत्यांनी भरभरून कमेन्ट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘तुमच्या गळ्यात देवी सरस्वतीचा वास आहे. तुमच्या सारखी सर्वोत्कृष्ट गायिका संपूर्ण विश्वात ना कधी झाली ना कधी होईल. दीदी तुम्ही भारत देशातील अनमोल असा कोहिनूर हिला आहात. देव तुम्हाला निरोगी असे दीर्घायुष्य देवो. कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात तुमचे स्थान आहे. तुम्ही सर्वांसाठी वंदनीय आहात.’

लता मंगेशकर


३० हून अनेक भाषांत गायली गाणी

लता मंगेशकर यांचे २८ सप्टेंबर रोजी १९२९ रोजी झाला. त्यांनी मराठी, हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. त्याबरोबरच इतर भाषांमध्ये देखील त्यांनी गाणी गायली आहेत.

लता मंगेशकर यांनी संगीताचे शिक्षण वडील दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून घेतले. पाच वर्षांच्या असताना त्यांनी गाणे शिकायला सुरुवातकेली. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे संगीत नाटकांमध्ये काम करतायचे. त्यांची स्वतःची नाटक कंपनी होती. लता मंगेशकर १३ वर्षांच्या असताना दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लतादीदींवर आली. ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. तसेच गायिका म्हणूनही संगीत विश्वामध्ये त्यांचे सर्वोच्च असे स्थान निर्माण केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here