मुंबई: गानकोकीळा लता मंगेशकर यांनी गायलेल्या सर्व गाण्यामध्ये लोकप्रिय असलेले गाणं म्हणजे ऐ मेरे वतन के लोगो… होय. लता दींदीच्या आयुष्यातील असे ६ प्रसंग जे अमर झालेत.

वाचा- लता दीदी आणि सचिन फायनल मॅच एकत्र पाहिली होती

१) ऐ मेरे वतन के लोगो… हे गाणं कवी प्रदीप यांनी लिहले. लता मंगेशकर यांनी प्रथम ते गाण्यास नकार दिला होता. कारण त्याच्या सरावासाठी त्यांना वेळ काढता येत नव्हता. पण कवी प्रदीप यांनी कस तरी करून गाण म्हणण्यास राजी केले. हे गाण लता दीदींना दिल्लीत १९६३च्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात म्हटले होते. लता दीदींना हे गाणं आशा भोसले यांच्या सोबत गायचे होते. दोघींनी त्याचा सराव देखील केला होता. पण दिल्लीला जाण्याच्या एक दिवस आधी आशा भोसले यांनी नकार दिला. तेव्हा लता दीदींनी एकट्याने ते गाणं म्हटले आणि अमर केले.

२)माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर हे एकमेकांचा खुप आदर करायचे. वाजपेयी लता दीदींना त्यांची मुलगी मानायचे. लता दीदी त्यांना दादा म्हणायच्या. या दोघांच्यातील एक खास किस्सा आहे. लता मंगेशकर यांनी त्याच्या वडीलांच्या नावावर सुरू केलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात वाजपेयींना आमंत्रीत केले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात वाजपेयी म्हणाले, तुमचे रुग्णालय चांगले चालावे, असे मी तुम्हाला म्हणू शकत नाही. असे म्हटले तर त्याचा अर्थ लोक अधिक आजारी पडू देत असा होतो. त्याचे हे वाक्य ऐकल्यानंतर लता दीदी हैराण झाल्या आणि काहीच बोलू शकल्या नाहीत.

वाचा- लतादीदींना अखेरचा आनंद शेवटी क्रिकेटनेच दिला; निधनाच्या काही तास

३)लता दीदींवर विषप्रयोग झाला होता असे वृत्त अनेकदा माध्यमांमध्ये येत असे. फार वर्षानंतर लता दीदींना यावर उत्तर दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की, होय ही गोष्ट खरी आहे. पण आम्ही मंगेशकर कुटुंबीय त्यावर बोलत नाही. कारण तो आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. ही गोष्ट १९६३ सालची होती. मला खुप अशक्तपणा वाटत होता. मला गादीवरून उठता येत नव्हते. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की डॉक्टरांनी त्यांना कधीच गाता येणार नाही असे म्हटले होते का? त्यावर लता दीदी म्हणाल्या, नाही ही गोष्ट खरी नाही. लोकांनी अफवा उठवल्या होत्या. मी माझा आवाज कधीच गमावला नाही. ३ महिन्यात गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू केले.

४)वयाच्या १३व्या वर्षी घराची जबाबदारी लता दीदींवर आली होती. यासाठी त्यांनी गाण्या सोबत चित्रपटात अभिनय देखील केला होता. १९४२ साली वडीलांचे निधन झाल्यावर आई आणि भावंडाची जबाबदारी लता दीदींवर आली. त्यांनी काही छोट्या चित्रपटात अभिनय केला. पहिली मंगळागौर हा त्यांचा पहिला चित्रपट होय. १९४२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी मुख्य अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांच्या छोट्या बहीणीची भुमीका केली होती. त्यानंतर त्यांनी चिमुकला संसार, माझे बाळ, गजाभाऊ, जीवन यात्रा, बडी मां, या चित्रपटात अभिनय केला.

५)लता दीदींचे गुरू गुलाम हैदर, स्वत: लता मंगेशकर आणि दिलीप कुमार हे मुंबईतील लोकलमधून कुठे तरी जात होते. हैदरांच्या मनात विचार आला चला दिलीप कुमार यांना लतांचा आवाज ऐकवूया, कदाचीत त्यांना काम मिळेल. लता दीदींना गाण्यास सुरूवात करताच दिलीप कुमार यांनी त्यांना थांबवले. मराठी लोकांच्या आवाजात डाळ-भातची सुंगध येतो. दिलीप कुमार यांना लता दीदींच्या उच्चाराबद्दल सांगायचे होते. त्यानंतर लता दीदींना हिंदी आणि उर्दू शिकण्यासाठी शिक्षक ठेवला होता.

६)लता दीदींच्या करिअरच्या सुरुवातीला अनेकांनी त्यांचा आवाज बारीक आणि कमकूवत असल्याचे सांगत तो नाकारला होता. लता दीदींचा आवाज प्रसिद्ध दिग्दर्शक एस मुखर्जी यांनी नाकारला. शहीद या चित्रपटासाठी लता दीदींचा आवाज ऐकला होता. मुखर्जी यांना त्यांचे गाणं ऐकले आणि सांगितले की आम्ही चित्रपटात काम देऊ शकत नाही. त्यांचा आवाज फारच बारीक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here