पोर्टलवर करासबमिट
तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र https://jeevanpramaan.gov.in/ जीवन प्रमाण पोर्टलवर सबमिट करू शकता. यासाठी तुम्हाला आधी पोर्टलवरून जीवन प्रण अॅप डाउनलोड करावं लागेल. इतकंच नाहीतर UDAI द्वारे प्रमाणित केलेलं फिंगरप्रिंट डिव्हाइस असलं पाहिजे. यानंतर, तुम्ही स्मार्टफोनद्वारे आणि अॅपमध्ये नमूद केलेल्या पद्धतींचा वापर करून घरी बसून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता.
घर बसल्या जमा करा जीवन प्रमाणपत्र
निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पेन्शनधारक १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्सचा वापर करून किंवा टपाल विभागाच्या घरोघरी सेवा वापरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर सादर करू शकतात.
कोणत्या बँका देतायत सुविधा?
भारतीय बँका स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, भारतीय आहेत. ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया.
तुम्ही वेबसाइट (doorstepbanks.com किंवा www.dsb.imfast.co.in/doorstep/login), किंवा ‘डोअरस्टेप बँकिंग’ मोबाइल अॅप्लिकेशनवर किंवा टोल फ्री क्रमांकावर (18001213721 किंवा 18001037188) कॉल करून बँकेची घरोघरी सेवा बुक करू शकता. )