औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर पोलीस ठाणे हद्दीत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला दुकानातून फुकट तंबाखू, गुटखा देत नसल्याने परिसरातील गुंडांनी फायटर, तलवारीने रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आहे. ज्यात या तरुणाच्या डोक्याला ७० टाके पडली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच या गुंडाचा हातात तलवारी घेऊन लग्नात नाचतानाचा व्हिडीओ समोर आला होता.
शुभम विनायक मनगटे (२४, रा. साईनगर,शिवाजीनगर ) याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तर घरातच किराणा दुकान सुद्धा आहे. दरम्यान ०५ जानेवारी रोजी शुभम एका लग्नसमारंभासाठी मित्रांसोबत गेला होता. त्याचवेळी घरावर बाहेरून काही तरुण लाथा घालत असल्याचा शुभमला भावाने फोन करून सांगितले. त्यामुळे शुभम मित्रांसोबत तात्काळ घरी आले असता तोपर्यंत दुकानाला लाथा मारणारे संशयित निघून गेले होते. तर दुकानाला लाथा मारणारे परिसरातील गुंड यश पाखरे आणि त्याचे साथीदार असल्याचं शुभमला घरच्यांनी सांगितले. …म्हणून लतादीदींनी घेतले मौलानांकडून उर्दूचे धडे! दरम्यान काही दिवसांपूर्वी गुंड यश पाखरे व त्याच्या साथीदारांनी फुकटात तंबाखू व गुटखा न दिल्यामुळे शिवीगाळ करून तुला पाहून घेईल अशी धमकी दिली होती. त्यानंतर पुन्हा घरावर येऊन राडा घातल्याने शुभमच्या परिचयाचा आणि यश पाखरेचा मावस भाऊ असलेल्या राजू पठाडे याच्याकडे जाऊन शुभम झालेली घटना सांगत असतानाच, तिथे यश पाखरे आणि त्याचे साथीदार आले. काहीही न सांगता त्यांनी हातातील फायटर, तलवार आणि चाकूने हल्ला चढवला. ज्यात शुभमला ७० टाके पडली आहे.
दोन दिवसांपूर्वीच सुटले आणि…..
यश पाखरे आणि त्याच्या साथीदाराची परिसरात दहशत आहे. दोन दिवसांपूर्वीच एका लग्नात हातात तलवारी घेऊन डान्स करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. मात्र जेलमधून सुटताच त्यांनी पून्हा तरुणाला मारहाण करत गंभीर जखमी केलं.