‘टाइम्स ऑफ इंडिया’नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. याशिवाय, पीडित व्यक्तीचा एक व्हिडिओ देखील फेसबुकवर शेअर होत आहे. रुग्णालयाच्या बेफिकीरीमुळं माझ्या पत्नीला व मुलाला करोना झाल्याचा आरोप त्यानं केला आहे. पीडित इसम मुंबईतील चेंबूर इथं राहणारा आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी आपल्या पत्नीला येथील एका नर्सिंग होममध्ये दाखल केलं होतं. २९ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याच्या पत्नीनं बाळाला जन्म दिला. त्यानं आपल्या पत्नीसाठी त्यांनी स्वतंत्र खोली मागितली होती. मात्र, प्रसूतीनंतर त्यांना एका वेगळ्याच खोलीत ठेवण्यात आलं होतं. ही खोली करोनाग्रस्तांसाठी राखीव होती. त्यातून त्यांच्या पत्नीला व बाळाला करोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप या इसमानं केला आहे. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी माझ्या पत्नीमध्ये करोनाची कुठलीही लक्षणं नव्हती, असा दावाही त्यानं केला आहे.
वाचा:
सध्या पीडित व्यक्तीची करोनाबाधित पत्नी व बाळ कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, पीडित व्यक्ती क्वारंटाइन वॉर्डमध्ये आहे. ‘कस्तुरबामध्ये माझ्या पत्नीला व मुलाला चांगले उपचार मिळत आहेत. मात्र, माझ्या बाळाची अधिक काळजी घ्यावी,’ असं आवाहन पीडित व्यक्तीनं केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times