औरंगाबाद : शिवसेना आणि राणे कुटुंबात सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप काही थांबायला तयार नाहीत. त्यातच आता शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबावर निशाणा साधला आहे. एक जेलमध्ये असून दुसराही दोन दिवस जाऊन आला आहे, असा टोला कायंदे यांनी लगावला आहे. औरंगाबाद येथील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित शिवसेना महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना कायंदे म्हणाल्यात की, भाजप नेत्यांना उठसूट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची सवय पडली आहे. पण असे आरोप करणार्‍यांचं काय झालं, कोकणातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंच काय झालं. एक जेलमध्ये आहे तर दुसरा दोन दिवस राहून आला. नारायण राणे यांना सुध्दा अटक झाली होती, असा टोला कायंदे यांनी लगावला.

डोक्याला ७० टाके पडेपर्यंत तलवारीने मारलं, कारण वाचून पोलिसही हादरले
तर याचवेळी कायंदे यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर सुद्धा निशाणा साधला. शिवसैनिकांनी सोमय्यांना चांगलाच हिसका दाखवला. नुसताच हिसकाचा नाही तर पायरी सुध्दा दाखवली असा टोला कायंदे यांनी यावेळी लगावला.

तर पुढे बोलताना त्या म्हणालल्यात की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशातील पहिल्या पाचमध्ये सर्वात उत्कृष्ट असे मुख्यमंत्री ठरले. पण तरीही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. एवढंच नाही तर आजारपणात सुद्धा त्यांना सोडला नाही. मोठं त्रास होत असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी काम केलं, पण उठसूट टीका करण्याची विरोधकांना सवयीच पडली असल्याचं कायंदे म्हणाल्यात.

केंद्राची कमाल! रेल्वे स्थानकाला मॉडर्न करण्यासाठी ‘या’ शहराला मिळाले फक्त १ हजार रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here