औरंगाबाद : मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारकडून २०२२ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तर महाराष्ट्राला यातून भरभरून निधी मिळाल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला. पण औरंगाबादच्या रेल्वे स्थानकाला या अर्थसंकल्पातून अवघ्या १ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या हास्यास्पद तरतुदीची औरंगाबादकरांमध्ये मोठी चर्चा आहे.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी संसदेत आकड्यांचा पाऊस पाडला. यामुळे आपल्या जिल्ह्याला काय मिळाले अशी अपेक्षा सर्वांनाच होती. तर मॉडेल रेल्वे स्टेशनच्या यादीत असलेल्या औरंगाबाद रेल्वे स्टेशन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघाचा जिल्हा आणि अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा जिल्हा असल्याने भरभरून तरतूद केली अशी अपेक्षा औरंगाबाद करांना होती. पण औरंगाबाद रेल्वे स्टेशनला अर्थसंकल्पातून अवघ्या १ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

डोक्याला ७० टाके पडेपर्यंत तलवारीने मारलं, कारण वाचून पोलिसही हादरले
औरंगाबाद रेल्वे स्थानकाचा मॉडेल रेल्वे स्टेशनच्या यादीत समावेश झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात भव्य इमारत तयार करण्यात आली. मात्र दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे उद्घाटन होऊन पाच वर्षे उलटले पण अजूनही प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नाही. त्यामुळे दानवे आणि कराड यांच्यामुळे तरी यावेळीच्या अर्थसंकल्पातून काही तरी पदरात पडेल अशी अपेक्षा औरंगाबादकरांना होती. मात्र भरीव तरतूद तर मिळाली नाही पण १ हजार रुपायांची हास्यास्पद तरतूद औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनला मिळाली.

Weather Alert : भारताच्या किनारपट्टी भागात पुराचा धोका वाढला, शास्त्रज्ञांकडून सतर्कतेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here