औरंगाबाद : औरंगाबाद शहरात ‘पंतप्रधान घरकुल योजना’वरून एमआयएमकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून आता आणखीनच राजकारण पेटण्याची शक्यता आहे. कारण, शहरात लावण्यात आलेले हे बॅनर महानगरपालिकेने रविवारी मध्यरात्री काढून टाकले आहेत. तर दुसरीकडे यावरून एमआयएम आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर दिवसा काम न करणारे महानगरपालिकेचे पथक रात्री आणि तेही रविवारी सुटीच्या दिवशी काम करत असल्याचा आरोप एमआयएमकडून करण्यात येत आहे.
लोकसभेतही मुद्दा गाजला….
पंतप्रधान घरकुल योजनेवरून खासदार जलील यांनी लोकसभेत सुद्धा आवाज उठवला होता. २०१६ मध्ये औरंगाबाद शहरातील ८० हजार ५१८ लोकांकडून पंतप्रधान घरकुल योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात ३५५ लोकांना घरे मिळाली असल्याचा उल्लेख जलील यांनी आपल्या भाषणातून केला होता.