कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

नितेश राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले जात आहे.
हायलाइट्स:
- न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे
- नितेश राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले जात आहे
आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी आज होणे अपेक्षित होते. मात्र, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी राज्यातील शासकीय कार्यालये आणि संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे ही सुनावणी उद्यापर्यंत लांबणीवर पडली आहे.
कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान तातडीने नितेश राणे यांच्या वकिलांनी आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे. या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले जात आहे. ओरोस जिल्हा रुग्णालयात कार्डियाक यंत्रणा आणि ह्रदयरोग तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे नितेश राणे यांना कोल्हापूरला नेण्यात येत असल्याचे समजते. कोल्हापुरातील भाजपचे कार्यकर्ते सकाळपासून सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते देखील कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Marathi News from Maharashtra Times, TIL Network