पुणे : बिबवेवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री टोळक्याने दहशत निर्माण करत एका तरुणावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुण घटनास्थळाहून पळाल्यामुळे तो थोडक्यात बचावला. त्यानंतर टोळक्याने परिसरात आरडा-ओरडा करत दहशत निर्माण केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली होती. (पुणे गोळीबाराची बातमी)

याबाबत अमित कैलास थोपटे (वय ३२, रा. शिवशंकर सोसायटी, बिबवेवाडी) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार सौरभ सरवदे, रुपेश सोनवणे उर्फ डिजे, निलेश सोनवणे, गणेश जगदाळे, बाबा बडबडे, अनिल कांबळे व इतर पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोपटे याचे दत्तवाडी परिसरात सलूनचे दुकान आहे. तो बिबवेवाडीत राहतो. त्याचा ४ फेब्रुवारी रोजी आरोपींसोबत वाद झाला होता.

Avalanche In Arunachal मोठी बातमी: अरुणाचलमध्ये हिमस्खलन; सात जवान दबले, गस्तीवर असतानाच…

बिबवेवाडीतील शिवशंकर सोसायटी समोर तक्रारदार, त्याचा भाऊ व इतर मित्र हे रविवारी रात्री अकराच्या सुमारास गप्पा मारत उभे होते. त्यावेळी ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भांडणावरून आरोपी व इतर आठ ते दहा जण त्या ठिकाणी आले. त्यांच्या हातात काठ्या, कोयते होती. परिसरात येतानाच ते आरडा-ओरडा करत येत होते. अमित थोपटे दिसताच त्याच्याकडे टोळके आले. ‘तुला खल्लास करतो,’ असे म्हणत सौरभ सरवदे याने त्याच्याकडील पिस्तूल काढले. हा सर्व प्रकार पाहून अमित थोपटे, त्याचा भाऊ व इतर सर्वजण पळाले. त्यावेळी आरोपीने थोपटे याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. पण, थोपटे याने गोळी चुकवल्यामुळे तो जखमी झाला नाही. त्यानंतर टोळक्याने परिसरात आरडा-ओरडा करत दहशत निर्माण केली. गोळीबार झाल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर टोळके पसार झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी टोळक्यातील आरोपींचा शोध सुरू केला आहे. थोपटे याचा आरोपींसोबत याआधी झालेल्या वादातूनच हा प्रकार घडला आहे. आरोपींनी त्याला बाहेर बोलवले होते. पण, तो तिकडे न गेल्यामुळे टोळक्याने या ठिकाणी येऊन दहशत निर्माण केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here