लंडन: क्रिकेटमध्ये एखाद्या सामन्यात पाऊस किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे अडथळा आला आणि त्यामुळे जर वेळ वाया गेला तर सामन्याचा निकाल लावण्यासाठी एका नियमाचा वापर केला जातो. डकवर्थ-लुईस या नावाने ओळखळ्या जाणाऱ्या नियमावर अनेक क्रिकेट चाहते नाराज असतात. कारण यामुळे अनेकदा चित्र-विचित्र असे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघाला मिळते. या नियमाचा ज्यांनी शोध लावला त्यापैकी एक झाले. ते ७८ वर्षाचे होते.

गणिततज्ञ यांनी फ्रँक डकवर्थ यांच्यासह मिळून क्रिकेट सामन्यांचा निकाल लावता यावा याासाठी एक नियम तयार केला होता. पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे जर सामन्यात अडथळा आला तर विरुद्ध संघाला किती धावांचे लक्ष्य द्यायचे याचा नियम तयार करणे गरजेचे होते. लुईस आणि डकवर्थ यांनी १९९७ मध्ये एक फॉर्म्युला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सादर केला. नंतर १९९९ मध्ये याचा वापर इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये करण्यात आला.

वाचा-
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बुधवारी एक निवेदन प्रसिद्ध केले. ईसीबीला टोनी लुईस यांच्या निधनाबद्दल दु:ख आहे. त्यांनी डकवर्थ यांच्यासह मिळून क्रिकेटला डकवर्थ-लुईस हा नियम दिला.

क्रिकेटमधील हा नियम अनेक वेळा वादग्रस्त देखील ठरला आहे. या नियमाला अनेक वेळा टीकेला सामोरे जावे लागले. २०१४ मध्ये यात थोडा बदल करण्यात आला आणि तो डकवर्थ-लुईस-स्टर्न या नावाने ओळखला जाऊ लागला. ऑस्ट्रेलियाचे गणिततज्ञ स्टिव्हन स्टर्न यांनी स्कोरिंग रेटनुसार यात बदल केले होते.

२०१४ मध्ये या नियमाचे नाव बदलले असेल तरी संपूर्ण क्रिकेट विश्व टोनी आणि फ्रँक यांचे हा नियम दिल्याबद्दल ऋणी असल्याचे ईसीबीने म्हटले आहे.

१९९२ मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सेमीफायनल सामन्यानंतर एखादा नियम असावा याचा विचार सुरू झाला. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १३ चेंडूत २२ धावांची गरज होती. पण पाऊसाचा अडथळा आल्यानंतर खेळ थांबवला. सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा आफ्रिकेला १३ चेंडूत २१ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

डकवर्थ-लुईसच्या आधी काय होते?
क्रिकेटमध्ये येण्याआधी ज्या संघाने अधिक सरासरीने धावा केल्या असतील त्याला विजयी घोषित केले जात असे. पण यामध्ये किती गडी बाद झाले आहेत त्याचा विचार केला जात नसे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here