बीजिंग, चीन : राजनैतिक संबंधांत शेजारील राष्ट्रांत पाकिस्तानला अधिक प्राथमिकता देणार असल्याचं गाजर चीनकडून आलंय. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी शनिवारी हे वक्तव्य केलंय.

शेजारील राजनैतिक संबंधांत चीनसाठी पाकिस्तानला ‘प्राथमिक’ स्थान आहे. ली यांनी त्यांचे पाकिस्तानी समकक्ष इम्रान खान यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय.

तर, आपलं सरकार चीन नागरिकांच्या आणि आपल्या देशात (पाकिस्तानात) सुरू असलेल्या प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठी हरएक संभाव्य प्रयत्न करेल, असं आश्वासन या भेटीनंतर इम्रान खान यांनी दिलंय.

चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’नं दिलेल्या वृत्तानुसार, अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यानंतर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे दुसरे सर्वोच्च नेते ली यांनी पाकिस्तानसोबत बहुआयामी व्यावहारिक संबंध मजबूत करण्याची चीनची इच्छा असल्याचं सांगितलं. चीन पाकिस्तानसोबतच्या घनिष्ठ धोरणात्मक संबंधांना नेहमीच महत्त्व देत आलंय, असंही ली यांनी स्पष्टपणे म्हटलंय.

अफगाण सीमेवर पाकिस्तानच्या पाच सैनिकांचा मृत्यू, लष्कराकडून चिंता व्यक्त
Lata Mangeshkar Demise: पाक – बांग्ला वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर ‘भारतरत्न’ लतादीदींना श्रद्धांजली​!
सध्या, पाक पंतप्रधान इम्रान खान चीन सरकारच्या निमंत्रणावरून बीजिंगच्या दौऱ्यावर असून त्यांनी शुक्रवारी पार पडलेल्या बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थिती दर्शवली.

इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ‘चीन पाकिस्तानमधून कृषी उत्पादनांच्या आयातीचा विस्तार करण्याबाबत गांभीर्याने विचार करेल’, असं आश्वासनही ली यांनी दिलंय.

चीनसोबतच्या धोरणात्मक भागीदारीचा संदर्भ देत इम्रा खान यांनी, आपला देश चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पासाठी वचनबद्ध आहे आणि इतरही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करत राहील, असं म्हटलंय.

Operation Save Rayan: १२० तासांची झुंज अपयशी; पाच वर्षीय बालकाच्या मृत्यूनं जग हळहळलं
राणी एलिझाबेथ यांचा राजमुकूट कॅमिला यांच्याकडे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here