पिंपरी चिंचवड : शहरात एका व्यक्तीने पत्नीच्या अंगावर डिझेल टाकत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने आणि जेवण बनवायला उशीर झाला नराधम पतीने हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. बाबू उर्फ राहुल पारधे असं आरोपीचं नाव आहे. (पिंपरी पुणे येथे गुन्हे)

राहुल पारधे आणि त्याची पत्नी पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर भागात राहतात. राहुल हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातच शनिवारी दुपारी जेवण बनवायला उशीर झाला म्हणून बाबू उर्फ राहुल याने थेट अंगावर डिझेल ओतून पत्नीला पेटवून दिले. या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिने याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना दिली.

पुण्यात पुन्हा गोळीबार : ३२ वर्षीय तरुणाला मारण्याचा प्रयत्न; थोडक्यात बचावला!

गुन्ह्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस उपनिरीक्षक शीतल गिरी आणि पोलीस उपनिरीक्षक कोकाटे यांनी आरोपी बाबू उर्फ राहुल याला अटक केली. त्याच्यावर कलम ३०७ प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकारात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here