लखनऊ : यूपीमध्ये सीएम योगी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर ‘लेडी डॉन’ नावाच्या एका बनावट ट्विटर अकाउंटवर योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांची वाहने बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

ट्विटमध्ये हापूर पोलिसांनाही टॅग करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास दक्षता पथक करत आहे. हापूर पोलिसांनीही याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

prakash javadekar : प्रकाश जावडेकर बरसले, ‘… आंबेडकरांना लोकसभेवर निवडून येण्यापासून कोणी रोखले?’

ओवेसी तो मोहरा है…

‘ओवेसी तो मोहरा है… असली निशाणा तो योगी आदित्यनाथ है’, अशी धमकी योगी आदित्यनाथ यांना लेडी डॉन नावाच्या बनावट ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली आहे. आता लवकरच भाजप नेत्यांच्या वाहनांवर RDX ने हल्ला केली जाईल, अशी धमकीही देण्यात आली आहे. यूपी पोलिसांनी ट्विटमध्ये टॅग करण्यात आलं आहे. आपल्या टीमकडे बघा, दिल्लीकडे पाहू नका. योगीना ठार करणार. लखनऊ रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकासह मेरठमध्ये १० ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचीही धमकी दिली गेली आहे.

ramdas athawale : राज्यसभेत कवितेतून आठवलेंचा काँग्रेसला टोला, ‘अपोझिशन नही है तगडा…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here