मांगेवाडी खिंडी व्हरवडे हा रस्ता खडकाळ असून या रस्त्यावर वर्दळ कमी असते. एका दुचाकीस्वाराला आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरखाली सापडलेल्या व्यक्तीचा मृतदेह दिसला. त्याने राधानगरी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत ट्रॅक्टरमालकाचा पत्ता शोधून काढला.
हा ट्रॅक्टर कसबा तारळे येथील व्यक्तीच्या मालकीच्या असून त्यावर जितेंद्र कांबळे चालक म्हणून काम करत होता. आज सकाळी कसबा तारळे येथील शेतातून उस तोडून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरला. ऊस भरलेला ट्रॅक्टर घेऊन जाताना तोल जाऊन भिमराव कांबळे खाली पडले आणि त्यांच्या अंगावर ट्रॉलीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान, राधानगरी पोलीस ठाण्यात चालकाच्या अपघाती मृत्यूची नोंद झाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.