औरंगाबाद : तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका आता औरंगाबादच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या शहर बसला सुद्धा बसताना पाहायला मिळत आहे. एसटी महामंडळाकडून चालक-वाहक उपलब्ध होत नसल्याने शहर बस जागेवर उभ्या आहेत, तर माजी सैनिकांच्या माध्यमातून अवघ्या १० बस चालवल्या जात आहे. पण याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत आहे.

करोनाच्या रूग्ण संख्येत घट झाल्याने शहरातील शहर बस पून्हा सुरू करण्यात आल्या, पण एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने चालक-वाहक उपलब्ध होत नाही. त्यामुळे यावर पर्याय म्हणून, प्रशासनाने माजी सैनिकांची नेमणूक करून २३ जानेवारीपासून शहर बससेवा पुन्हा सुरू केली. पण त्यातही १०० पैकी १० बसेस धावत आहेत. त्यामुळे अजूनही अनेक मार्गावर शहर बस पोहचत नसल्याने प्रवाशांवर नाइलाजाने खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्याच्या जनधन खात्यात आले १५ लाख; स्वप्नातलं घर बांधलं अन् समोर आली धक्कादायक माहिती
यात शाळा सुरू झाल्या असून, आगामी काळात दहावी-बारावीच्या परीक्षा सुद्धा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शहर बस पूर्ण क्षमतेने सुरू होणे गरजेचे आहे. मात्र, संपावर तोडगा निघत नसल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना सुद्धा बसणार आहे. विशेष म्हणजे, स्मार्ट सिटी प्रशासन कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडे सतत पाठपुरावा करत आहे. मात्र, वाहक व चालक उपलब्ध होत नसल्याने स्मार्ट सिटी प्रशासन सुद्धा हतबल झालं आहे.

मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मान्यता मिळणार का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here