औरंगाबाद : पंतप्रधान घरकुल योजनेवरून गेल्या आठवड्याभरापासून औरंगाबाद शहराचे राजकारण चांगलेच तापले असतानाचं, आता प्रशासनाला उशिराच शहाणपणा सुचले आहे. तर लोकसभेच्या स्थायी समितीने जिल्ह्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना साक्षीसाठी हजर राहण्याचे आदेश देताच या अधिकाऱ्यांनी तडकाफडकी घरकुल योजना राबविण्यासाठी तीन ठिकाणच्या जागांना मंजुरी दिली. विशेष म्हणजे जागा उपलब्ध करून देण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत आवाज उठवला होता.

२०१६ मध्ये औरंगाबाद शहरातील ८० हजार ५१८ लोकांकडून पंतप्रधान घरकुल योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ३५५ लोकांना घरे मिळाले आहे. तर पंतप्रधान घरकुल आवास योजना राबविण्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मनपाने जागेची मागणी केली होती. मात्र, मनपा व जिल्हाधिकाऱ्यातील असमन्वयामुळे जागाच मिळेना, अशी तक्रार खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेच्या स्थायी समितीकडे केली. त्यानंतर स्थायी समितीने विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना समितीसमोर हजर राहण्याचे आदेश काढले होते. त्यानंतर आता या अधिकाऱ्यांनी तडकाफडकी घरकुल योजना राबविण्यासाठी तीन ठिकाणच्या जागांना मंजुरी दिली आहे.

शेतकऱ्याच्या जनधन खात्यात आले १५ लाख; स्वप्नातलं घर बांधलं अन् समोर आली धक्कादायक माहिती
राजकारण पेटलं…

पंतप्रधान घरकुल योजनेवरून एमआयएमने आक्रमक भूमिका घेत शहरात आंदोलन करत, शहरातील चौकात प्रधानमंत्री फेककुल योजना आणि स्वप्नातील घर स्वप्नातचं मिळणार असे उल्लेख करणार बॅनर लावली होती. तर यावरून भाजपने एमआयएमवर निशाणा साधला होता. त्यातच महानगरपालिकेने एमआयएमने लावलेले बॅनर रातोरात काढून घेतल्याने, एमआयएमने नाराजी व्यक्त करत मनपाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून ‘मोदींच्या महत्वकांशी योजने’वरून शहरात राजकारण चांगलंच तापले आहे.
मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मान्यता मिळणार का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here