कोल्हापूर: चोरी करताना रोख सात हजार आणि ३२ हजार किंमतीचे दागिने मिळाल्यानंतर चोरट्याने घर सोडताना लाल रंगात ‘हे घर भिकारी आहे’ असा मजकूर लिहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आर. के. नगर परिसरात एका घरी पती-पत्नी दोघेच राहतात. त्यांची मुले नोकरी आणि शिक्षणासाठी परगावी आहेत. दोघे पती-पत्नी दोन दिवसांपूर्वी बाहेर गावी जाताना घराला कुलुप लावून गेले. ही संधी साधून चोरट्यांनी घर फोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे, तिजोऱ्या तपासून चोरट्यांनी सर्व साहित्य विस्कटून टाकले. त्यांना रोख सात हजार रुपये आणि कमी वजनाचे दागिने मिळाले. मिळालेली रक्कम आणि दागिने चोरून बाहेर जाताना त्यांनी घराच्या भिंतीवर लाल अक्षरात ‘हे घर भिकारी आहे’, असा मजकूर लिहिला. संबंधित दाम्पत्य गावाहून परत आल्यावर दाराचे कुलुप तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच सर्व साहित्य विस्कटले असून रोख रक्कम आणि दागिने गेल्याचे लक्षात आले. तसेच भिंतीवर लिहिलेला मजकूरही त्यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी करवीर पोलिस ठाण्यात चोरी झाल्याची फिर्याद दिली.

वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here