नागपूर : गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संत्रा मार्केट परिसरात सापळा रचून एमडीची तस्करी करणाऱ्या आईस्क्रिम पार्लर संचालिकेसह तिघांना अटक केली. संगिता राजेंद्र महेश्वरी (वय ४१, रा. अयोध्यानगर), शिवशंकर चंद्रभान कांद्रीकर (वय ३४, रा. गोळीबार चौक) व आकाश चंद्रकांत ढेकळे (वय ३७, रा. वकिलपेठ), अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगिताचे अयोध्यानगर परिसरात आईस्क्रिम पार्लर आहे. तीन जण एमडीची तस्करी करणार असल्याची माहिती गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांना मिळाली. फुलारी, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक मनोज सिडाम, साहाय्यक पोलीस निरीक्षक बद्रीनारायण तांबे, सूरज सुरोशे, हेडकॉन्स्टेबल प्रमोद धोटे, प्रदीप पवार, सुनील इंगळे, नामदेव टेकाम, रुबिना शेख, नितीन मिश्रा, विवेक अढाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांनी संत्रा मार्केट परिसरता सापळा रचला.
शेतकऱ्याच्या जनधन खात्यात आले १५ लाख; स्वप्नातलं घर बांधलं अन् समोर आली धक्कादायक माहिती
पोलीसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख ७० हजार रुपये किमतीची एमडी, १७ हजारांची रोख व कार जप्त करण्यात आली. पोलीसांनी तिघांची १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी घेतली. कांद्रीकर या रॅकेटचा सूत्रधार असून त्याने कोणाकडून एमडी आणले याचा तपास पोलीस करीत आहेत.

मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मान्यता मिळणार का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here