मुंबई: करोना काळात राज्य सरकार मजूर, गरीबांसोबत उभे राहिले आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लागू केला. ‘नमस्ते ट्रम्प’च्या प्रकरणामुळे देशात करोना पसरला. ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, सोमवारी करोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास घाणेरडे राजकारण आणि महाराष्ट्र सरकारही जबाबदार असल्याचा आरोप केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. करोना काळामध्ये महाराष्ट्र सरकार मजूर आणि गरिबांच्या पाठिशी उभे राहिले. मात्र, तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाउन लागू केला, अशी टीका मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात करोनाचा प्रादूर्भाव आणि प्रसार वाढला, ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, असंही मलिक म्हणाले.

sanjay raut : स्थलांतरीत मजुरांवरील PM मोदींच्या वक्तव्यावरून राऊतांचा निशाणा, ‘हा महाराष्ट्रातील… ‘
migrant workers : केजरीवाल यांचा योगींवर निशाणा, ‘गंगेत मृतदेह वाहत होते आणि हे…’

जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी करोना पसरणार नाही, असे सांगितले होते. ‘नमस्ते ट्रम्प’च्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले. ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात करोना पसरला, असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला.

‘काँग्रेसने महाराष्ट्रातल्या यूपी, बिहारींना मोफत तिकीट काढून हाकलून दिलं’

मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले. कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना, त्यांची सर्व व्यवस्था केली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर चालत निघाले होते. शेवटी आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बस सुरू केल्या, परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळ्या वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोक भोगत आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.

pm modi speech in lok sabha : PM मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने हद्द केली, रेल्वेचे मोफत तिकिट देऊन मुंबईतून…’
काँग्रेसनेही साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोप केल्यानंतर काँग्रेसनेही आता प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील उत्तर भारतीयांनी देशात करोना पसरवला असं मोदींचं म्हणणं आहे, असं काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले. उत्तर भारतीयांना गावी पाठवण्यावरून बोलणारे भाजप नेते आता गप्प का, असा सवालही त्यांनी केला. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना करोना सुपरस्प्रेडर असल्याचं सागून त्यांचा अपमान केला आहे, त्याबद्दल मोदी यांनी माफी मागावी, असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि भाजपला तुमच्याबद्दल किती प्रेम आहे हे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जनतेनं समजायला हवं. त्यांनी अपमान केला आहे आणि त्याचं सडेतोड उत्तर भाजपला मुंबई महापालिका आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत मिळेल, असंही सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here