बीडः बीडमध्ये आज शंभर कोटी पेक्षा जास्त विकास कामाचे उद्घाटन होते. मात्र या उद्घाटन या विकासाच्या कामाला जिल्हा शिवसेनेचा विरोध दिसून आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन या उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम बीडमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाला मिरच्या शिवसेनेचा विरोध असल्याचं पाहायला मिळालं. आज या कार्यक्रमाचे उद्घाटक असून बीडमध्ये शिवसेनेचा काळे झेंडे दाखवत विरोध पाहायला मिळतोय.मात्र काही वेळा हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच हा विरोध पुढे आला आहे. मात्र या आधीही या कार्यक्रमाला विरोध करण्याचा इशारा देण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थित आज हा कार्यक्रम होणार होता. मात्र, त्याआधीच शिवसेनेचा हा विरोध पाहायला मिळाला. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आम्ही आणलेल्या कामावर सरळ सरळ डल्ला मारला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आम्ही केलेल्या विशेष कामासाठीच ह्या कामाला मंजुरी दिली होती. मात्र, यावर आमदार संदीप क्षीरसागर डल्ला मारत आहेत आणि काम करत असताना आमदार हे आडकाठी आणत आहेत, असं म्हणत आक्रमक झालेले पाहायला मिळाले आणि आजच्या कार्यक्रमाला विरोध दाखवत घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत विरोध दर्शवला आहे.

वाचाः
शिवसेनेनं आज होणाऱ्या विकास कामांना त्यांनी विरोध दाखवला आहे. यामध्ये शिवसैनिक गनिमीकाव्याने विरोध दाखवत आहेत आणि या कार्यक्रमांमध्ये शिवसैनिक गोंधळ देखील करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय. यावेळेस घोषणाबाजी करत अजित दादा तुमच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला राष्ट्रवादीचा धर्म शिकवा असं म्हणत बॅनर व घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. यावेळेस शिवसैनिक काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली या सगळ्या वातावरणामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी विकास कामाच्या मुद्द्यावरून आमने-सामने आलेली पाहायला मिळाली आहे.

वाचाः

बीड जिल्ह्यात १०० कोटी पेक्षा जास्त विकास कामाचे उद्घाटन होत आहे मात्र आम्ही आणलेल्या कामावर संदीप क्षीरसागर हे परस्पर उद्घाटन करतात आम्ही जे काम करत असतो त्या कामात आडकाठी आणतात असेही शिवसैनिकांकडून म्हटले जात आहे. आता या विकास कामाचं नेमकं होणार काय हेच पाहणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here