मुंबई: एनसीबी मुंबईचे तत्कालीन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबद्दल काहीही आक्षेपार्ह बोलणार नसल्याची लेखी हमी मुंबई हायकोर्टात देऊनही पुन्हा त्याचा भंग करून कोर्टाचा अवमान केल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबद्दल काहीही आक्षेपार्ह वक्तव्ये करणार नसल्याची लेखी हमी मलिक यांच्या वतीने कोर्टात देण्यात आली होती. मात्र, हमी देऊनही त्याचा भंग करून कोर्टाचा अवमान केल्याची याचिका वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात दाखल केली होती.

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर एनसीबीच्या कारवायांवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित करत समीर वानखेडे यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबतची वेगवेगळी माहिती उघड केली होती. त्यामुळे कुटुंबीयांविरोधात सातत्याने प्रसारमाध्यमांसमोर वक्तव्ये करणे आणि त्यातून आमची बदनामी केली जात असल्याचे वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. त्याबाबत झालेल्या सुनावणीत वानखेडे कुटुंबीयांबाबत आक्षेपार्ह विधाने करणार नाही, अशी हमी मलिक यांनी कोर्टात दिली होती.

OBC Reservation : ओबीसींची लोकसंख्या ३८ टक्के; आयोगाच्या अंतरिम अहवालात काय?

मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्याला मारण्याचा ठाकरे सरकारचा प्लान | सोमय्या

मात्र, मलिक यांनी पुन्हा कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली, असा आरोप करत वानखेडेंचे वडील ज्ञानदेव यांनी गेल्या महिन्यात अवमान याचिका दाखल केली होती. याबाबत मागच्या गुरुवारी खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. त्यावेळी तुम्ही वानखेडे यांची बदनामी करण्याचा प्रकार या ना त्या प्रकारे करत आहात. तुम्हाला असे करून काय मिळवायचं आहे? यापूर्वीच्या आदेशात दिलेल्या सवलतीचा आधार घेत अशी वक्तव्ये केली जात असतील तर सवलत काढून घ्यावी लागेल, असा इशारा खंडपीठाने मलिक यांना मागील सुनावणीवेळी दिला होता. तसेच वानखेडे यांच्या याचिकेविषयी ७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश मलिक यांना देण्यात आले होते.
raut warns ed: ‘मी त्यांना चहाही पाजेन, पण…’; संजय राऊत यांनी ईडीला दिला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here