रबात, मोरक्को :

मोरक्कोमध्ये खेळता खेळता कोरड्या विहिरीत पडलेल्या पाच वर्षांच्या रायन ओरम या चिमुरड्याला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. परंतु, या घटनेतही ‘रिअल हिरो‘ ठरलेल्या ब्वा साहरोई यांचं जगभर कौतुक होताना दिसतंय. (Morocco boy death in well – Bwa Sahraoui)

ब्वा साहरोई यांनी रायनला वाचवण्याच्या प्रयत्नात मोलाची मदत केली. स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, रायन ओरम हा पाच वर्षांचा चिमुरडा एका कोरड्या विहिरीत पडला. ही विहीर जवळपास १०० फूट खोल होती.

सलग पाच दिवस – १२० तास – सेव्ह रायन ऑपरेशन राबवण्यात आलं. मुलापर्यंत पोहचण्यासाठी आणि त्याला या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी हरएक संभाव्य प्रयत्न करण्यात आले. परंतु, मुलाला बाहेर काढलं गेलं तोवर त्याचे श्वास थांबले होते.

Operation Save Rayan: १२० तासांची झुंज अपयशी; पाच वर्षीय बालकाच्या मृत्यूनं जग हळहळलं
Winter Olympic: गलवान हिंसाचारात सहभागी झालेल्या सैनिकाच्या निवडीवर चीन म्हणतं…
सोशल मीडियावर #SaveRayan आणि याचं शब्दाचं अरबी भाषांतर संपूर्ण अरब जगतात ट्विटरवर ट्रेंड करत होतं.

परंतु, प्रयत्न करूनही मुलाचे प्राण वाचवण्यात यंत्रणांना अपयश आलं. याच प्रयत्नांत ब्वा साहरोई यांनी मोलाचं सहकार्य केलं. या रिअल हिरोनं तब्बल तीन दिवसांपूर्यंत आपल्या हातानं माती खोदून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्वा साहरोई यांचाही ‘ऑपरेशन सेव्ह रायन‘च्या बचाव दलात सहभाग होता. मुलाला वाचवण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला. परंतु, ज्या ठिकाणी मशीन पोहचू शकत नाही अशा ठिकाणी ब्वा यांनी रायनला वाचवण्यासाठी केवळ आपल्या हातांचा वापर केला.

मुलाचा जीव वाचवण्यात अपयश आलं असलं तरी ब्वा साहरोई यांच्या मेहनतीचं आणि धाडसाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होतंय.

Partygate Scandal: ऋषी सुनक यांच्यावर विघ्न… पंतप्रधान होण्याचे मार्ग बंद होणार?
Nepal China Border: नेपाळच्या भूभागावरही चीनची घुसखोरी, सरकारचा अहवाल लीक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here