मालिकेच्या येणाऱ्या भागात कार्तिक आणि दीपाच्या आयुष्यात काहीआनंदाचे क्षण येणार आहेत. मालिकेच्या नवीन प्रोमोनुसार दीपिका आणि कार्तिक पुन्हा एकत्र येणार आहेत, कार्तिक, दीपा आणि कार्तिकीचा स्वीकार करून त्यांची अपूर्ण राहिलेली चौकट पूर्ण करेल.
हो हे खरं आहे, रंग माझा वेगळा मालिकेचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. यात कeर्तीक सौंदर्या समोर सांगताना दिसतो की मी दीपाला माझी बायको म्हणून स्वीकार करतो तसंच मी यं पुढे कधीही दीपा आणि कार्तिकीला माझ्यापासून आमि घरापासून दूर जाऊ देणार नाही हे मी तुझ्या समोर (सौंदऱ्या समोर) वचन देतो. हा प्रोमो पाहून चाहते आनंदी झाले आहेत. इन्स्टाग्रामवर चाहते कमेंट करत मालिकेत सुरू असणाऱ्या ट्रॅकमुळे ते खूप खुश असल्याच दिसत आहे.
वाहिनीने आणखीन एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात कार्तिक आणि दीपाचं कुटुंब एकत्र आनंदानं दिसत आहे. मात्र हे सत्य आहे का स्वप्न हे आजच्या भागात कळेल. त्यामुळे चाहते येणाऱ्या हे जाणून घेण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत.