किरकोळ कारणावरुन उचगाव उड्डाणपुलाजवळ २ जानेवारी २०१६ रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास राजवर्धन गवळी (वय २०, रा. गवळी गल्ली, शनिवार पेठ) याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहा्य्यक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
जिल्हा न्यायालयात सरकारी वकील एन.बी. आयरेकर यांनी काम पाहिले, मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने या खटल्याचे कामकाज जिल्हा सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी पाहिले. खटल्यात ११ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी चार साक्षीदारांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. समोर आलेले पुरावे, सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य माणून न्यायालयाने आरोपी शिवराज चंद्रकांत पोवार यास जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.