सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील बसस्थानकाच्या शेजारी जुनी पोलीस लाईनजवळ व चोपडा रस्त्याच्या बाजूस वाहने दुरूस्ती करण्याची दुकाने आहेत. याठिकाणी दुरूस्तीच्या कामांसह चारचाकी वाहनांमध्ये विना परवाना गॅस कीट बसवण्याचे काम सुरू असते. अशाच पद्धतीने मंगळवारी दुपारच्या सुमारास एका चारचाकी वाहनात गॅसकीटच्या माध्यमातून गॅस भरण्याचे काम सुरू असताना गॅस गळतीमुळे कारने अचानक पेट घेतला.
काही कळण्याच्या आता संपूर्ण कारने पेट घेतला. या आगीत कार जळून खाक झाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आग विझवण्यात आली असून याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.