‘त्या’ आदेशाचे व्हावे पालन
स्थानिक प्रशासनाने ४ जून रोजीच्या आदेशाचे पालन करायला हवे. त्या आदेशानुसार ऑक्सिजन बेडची उपलब्धता आणि करोना चाचणीच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर यावरून निर्बंध निश्चित करण्यात येतात. निर्बंधांच्या वेगवेगळ्या लेव्हलदेखील त्यात निर्धारित करण्यात आल्या आहेत. परिणामत: त्या आदेशाचे पालन झाल्यास, अशा प्रकारची विधाने करण्याची स्थिती निर्माण होणार नाही, अशी भूमिका व्यावसायिकांद्वारे मांडण्यात येत आहे.
Home Maharashtra नागपूर बातम्या मराठी: ‘आम्हालाही द्या दीडपर्यंत परवानगी’, हॉटेल संचालक आक्रमक; प्रशासनाकडे मागणी...
नागपूर बातम्या मराठी: ‘आम्हालाही द्या दीडपर्यंत परवानगी’, हॉटेल संचालक आक्रमक; प्रशासनाकडे मागणी – give us permission till half past one hotel director aggressive demand to the administration
नागपूर : करोना संक्रमणाच्या नावाखाली हॉटेल रात्री दहा वाजता बंद करण्याचा निर्बंध लावण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी मुंबई, पुणे येथे रात्री दीड वाजतापर्यंत हॉटेल्स खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आम्हालाही रात्री दीडपर्यंत अनुमती द्या, अशी मागणी शहरातील हॉटेल-रेस्टॉरंट संचालकांनी प्रशासनाकडे केली आहे.