मुंबई: राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला असून जिल्ह्यात आज आणखी सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील दोघे परदेशी नागरिक असून दिल्लीतील ‘मरकज’मध्ये सहभागी झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या एकूण १४ झाली असून राज्याचा आकडा ३४१ वर पोहोचला आहे.
नगरच्या आरोग्य विभागानं काही संशयित रुग्णांच्या घशाचे स्त्राव पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील ५१ रुग्णांचे अहवाल मिळाले असून सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, तब्बल ४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नव्या सहा करोन रुग्णांपैकी दोघे परदेशी नागरिक आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times