मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोप केला आहे. संजय राऊत यांच्या ‘लेटर बॉम्ब’नंतर भाजपनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी काही चुकीचे केलेले नाही, त्यांना कुणाचीही भीती वाटत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नायडू यांना पत्र लिहिलं असून, ते पत्र ट्विटही केलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे, असा आरोप त्यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. मला ईडीच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या पत्रानंतर खळबळ उडाली आहे. ठाकरे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे आणि नकार दिल्यानंतर ईडीच्या माध्यमातून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. १७ वर्षांपूर्वीच्या जमीन खरेदी प्रकरणात ईडीने चौकशी सुरू केली आहे. मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चाचा तपासही होत आहे. फुलविक्रेता आणि डेकोरेटर्सलाही धमकावले जात आहे, असा आरोप त्यांनी पत्रात केला असून, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हस्तक्षेप करून याबाबत कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut : महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव, संजय राऊत यांचं खळबळजनक पत्र
Sanjay Raut: मुलीच्या लग्नानंतर मला अडकवण्यासाठी ईडीने ‘असा’ सापळा रचलाय; संजय राऊतांचा दावा

तुरुंगात टाकण्याची धमकी

संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकाकडून तपास यंत्रणांचा चुकीचा वापर होत आहे. जवळपास एका महिन्यापूर्वी काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता. ठाकरे सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करा, असं त्यांनी सांगितलं होतं. राज्यात मध्यावधी निवडणुका होण्यासाठी या कामात मदत करावी असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर मी नकार दिल्यानंतर मला तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली, असा दावा राऊत यांनी केला. मी केंद्र सरकारविरोधात वारंवार आवाज उठवत आहे. त्यामुळे मला यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही राऊत यांनी नमूद केले आहे.

…त्यांनाच भीती वाटतेय – भाजप

संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेले पत्र ट्विट केले आहे. त्याच ट्विटला रिट्विट करत भाजप नेते राम कदम यांनी टीका केली आहे. ज्यांनी काही चुकीचे केलेले नाही, त्यांना कुणाची भीती वाटत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. कदम म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते घाबरलेले आहेत हेच यावरून स्पष्ट होत आहे. जर त्यांनी काही आर्थिक घोटाळे केले नाहीत तर, मग ते का घाबरलेले आहेत? असा प्रश्नही कदम यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांची उपयुक्तता संपलेय, महाविकासआघाडीनं त्यांना ‘टाकून’ दिलंय: आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here