औरंगाबाद : कितीही जवळचा असल्यास गाडी देताना विचार करावा असे अनेकदा म्हटलं जातं. याचाच प्रत्यय एका सासऱ्याला आला आहे. कारण लग्नाला जाण्यासाठी जावई आणि त्याच्या मित्राला कार देणं सासऱ्याला चांगलाच महागात पडलं आहे. जेव्हा पोलीस घरी आली तेव्हा सासऱ्याला डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करमाड पोलीस ठाणे हद्दीतील करमाड गावाच्या जवळपास ६ फेब्रुवारी रोजी दुपारी जालना येथुन कालीका स्टील कंपनीचा स्टील घेऊन जाणाऱ्या ट्रक चालक उमेश मल्हारी लाड याला आज्ञात आरोपींनी रात्री ट्रकसमोर कार आडवी उभी लावत, जीवे मारण्याची धमकी देत ११ टन ८९० किलो सळाईने भरलेला ट्रक पळविला. त्यानंतर पहाटे तीन वाजेच्या सुमारास आरोपींनी ट्रक चालकाला कचनेरच्या पुलाखाली सोडले व ते पसार झाले. प्रकरणात करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रोजच्या जेवणाला महागाईची फोडणी! २० टक्क्यांनी वाढले मसाल्याचे भाव, पाहा काय आहे नवा दर?

यादरम्यान पोलिसांना आरोपींनी वापरलेल्या कारचा नंबर मिळाला. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करत कार मालकाच घर गाठले. पण माझी कार तर मी जावई नितेश भेरे आणि त्याचा मित्र गजानन ढगे यांना लग्नाला जाण्यासाठी दिल्याच सासऱ्याने सांगितले. मग पोलिसांनी जावई आणि त्याच्या मित्राला उचललं आणि आपणच मित्रांच्या मदतीने ट्रक लुटल्याची त्यांनी कबुली दिली.

‘या’ तारखेपर्यंत मुंबई संपूर्ण निर्बंधमुक्त होणार, महापौरांची माहिती

हे आहेत आरोपी…

पोलिसांनी सुरवातीला नितेश मारुती भेरे (२३, रा. करजगाव ह.मु. करमाड )आणि त्याचा मित्र गजानन परसराम ढगे (२२, रा. पिरसावंगी ता. बदनापुर जि. जालना),याला ताब्यात घेताच आणखी काही नाव समोर आली. ज्यात अनिकेत प्रभाकर उकर्डे (२१, रा. करमाड ), नितीन पाराजी बोचरे (२३, रा. मंगरुळ ) आणि नवीद शहा युसूफ शहा ( २६, रा. पिंप्रीराजा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर परमेश्वर दाभाडे (रा. मुरुमखेडा ता. बदनापुर) नावाचा आरोपी अजूनही फरार आहे.

सर्वांसाठी घराचे स्वप्न अपूर्णच! पीएम आवासमधील खासगी प्रकल्पांना हवे अनुदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here