औरंगाबाद : देशभरातील वाढत्या करोनाला महाराष्ट्रातील काँग्रेस जबाबदार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. मोदींच्या याच विधानाला विरोध करत आज ( बुधवार ) राज्यभरात आज काँग्रेसकडून रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात येत आहे तर औरंगाबादमध्येही काँग्रेसने ‘शर्म करो मोदी’ आशा घोषणा देत आंदोलन केलं, यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.

औरंगाबाद-जालना रोडवरील मुकंदवाडी बसस्थानकावर १२ वाजेच्या दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शर्म करो मोदी, मोदी सरकार हाय-हाय, मोदी सरकारच करायचं काय, देशात करोना पसरवणार मोदी सरकार हाय-हाय अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या, तसेच यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.

लग्नासाठी जावयाने नेली कार, पोलीस घरी येताच सासरे हादरले; केला भयंकर गुन्हा

खरा करोना तर मोदींनी आणला…

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष कल्याण काळे म्हणाले की, काँगेसने करोना पसरवला आरोप करणाऱ्या मोदींनीच खरा करोना पसरवला असा आरोप केला. कारण, जेव्हा जगभरात करोनाचे रुग्ण निघत होते. त्यावेळी अनेक देश विमानसेवा बंद करत असताना मोदींनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेब्रुवारी २०२० मध्ये भारतात आणले आणि ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचा भाग म्हणून अहमदाबादमधील एका स्टेडियममध्ये जाहीर सभा घेतली. त्यामुळेच भारतात करोना वाढला असा आरोप काळे यांनी केला.
सांबांचा नो थांबा! वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांनो सावधान, तुमच्यावर आता असा आहे ‘वॉच’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here