दुबई, संयुक्त अरब अमिरात :

रशिया आणि युक्रेन तणावात युक्रेनच्या बाजुनं रशियाविरुद्ध लढण्यास सज्ज झालेल्या अमेरिकेनं आता संयुक्त अरब अमिरातच्या संरक्षणासाठीही तयारी सुरू केलीय. येमेनच्या इराण समर्थक हुथी बंडखोरांच्या हल्ल्याच्या सावटाखाली असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) रक्षणासाठी अमेरिका पुढे सरसावलीय.

यूएईचं संरक्षण निश्चित करण्यासाठी अमेरिकेनं आपलं सर्वात धोकादायक म्हणून ओळखलं जाणारं एफ-२२ (F-22) हे लढाऊ विमान आणि गाइडेड मिसाईल विनाशक तैनात करणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच अमेरिकेची ‘यूएसएस कोल’ ही युद्धनौका आखाती देशातील समुद्रात गस्त घालणार आहे.

‘संकटाच्या वेळी एक मित्र दुसऱ्या मित्राला मदत करत आहे, असं आम्ही समजतो’ असं यूएस आर्मीच्या सेंट्रल कमांडनं मंगळवारी एका निवेदनात म्हटलंय.

यूएस आर्मी सेंट्रल कमांडचे कमांडर केनेथ एम मॅकेन्झी सध्या अधिकृतपणे यूएईच्या दौऱ्यावर आहेत. ‘लढाऊ विमानं आणि युद्धनौकांची तैनाती यूएईची हवाई संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. यूएईला सध्या हुथी बंडखोरांकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे’, असं वक्तव्य त्यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान केलंय.

रशिया – युक्रेन तणावात फ्रान्सची शिष्टाई; संवाद पुढे सरकण्याची आशा
Nepal China Border: नेपाळच्या भूभागावरही चीनची घुसखोरी, सरकारचा अहवाल लीक
शत्रुचे ड्रोन उडण्यापूर्वीच नष्ट करणार

शत्रूचे ड्रोन उडण्यापूर्वी ते नष्ट करण्यासाठी ‘प्रभावी उपाय’ शोधण्यासाठी अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांसोबत काम करत असल्याचं, यूएस जनरलनं म्हटलंय. शत्रुच्या ड्रोनचं प्रक्षेपण पकडू शकेल, त्यांना सहजपणे शोधून काढू शकेल आणि त्यांचं उड्डाण मध्येच रोखू शकेल, अशी यंत्रणा शोधून काढण्यावर काम सुरू आहे. मात्र, हे शक्य झालं नाही तरीही तुम्ही निश्चितच अशा स्थितीत असाल जिथे शत्रुचे ड्रोन मार्गातच नष्ट करता येऊ शकतील, असा इशाराही त्यांनी दिलाय. .

F-22 : जगातील सर्वात धोकादायक विमानांपैकी एक

F-22 रॅप्टर हे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान आहे. जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांमध्ये या विमानाची गणना केली जाते. F-22 रॅप्टर हे अमेरिकन कंपनी ‘लॉकहीड मार्टिन’कडून तयार करण्यात आलंय.

१५ डिसेंबर २००५ रोजी एफ-२२ चा यूएसच्या हवाई दलात समावेश करण्यात आला. अमेरिकेनं आतापर्यंत एफ-२२ चे १९५ युनिट्स बनवले असून त्यापैकी आठ विमानं चाचणीसाठी निर्धारित करण्यात आली आहेत. उर्वरित १८७ एफ-२२ रॅप्टर विमानं यूएस हवाईदलात कार्यरत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, अतिशय धोकादायक तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेलं हे विमान अमेरिकेनं आत्तापर्यंत इतर कोणत्याही देशाला विकलेलं नाही.

कर्नाटक हिजाब वाद : मुस्लिमांच्या दडपशाहीचा कट, पाकिस्तानकडून आगीत तेल
‘ह्युंदाई’च्या ‘त्या’ पोस्टवरून गदारोळ; दक्षिण कोरियाची भारताकडे दिलगिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here