तरुणांमध्ये लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली असून या घटनेचा व्हिडिओ काही तरुणांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या तरुणांमध्ये नेमक्या कोणत्या कारणातून हाणामारी झाली, याबाबतची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या घटनेची जिल्ह्यात आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
नाशिकमधील महाविद्यालयात हाणामारीची ही पहिली घटना नाही. याआधीही डोंगरे वसतीगृह येथील एका महाविद्यालयातील तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. महाविद्यालयातील या ‘फ्री स्टाईल’ हाणामारीमुळे महाविद्यालयातील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.