मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील रहिवासी अजय सीताराम इंगळे हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. गावातीलच २८ वर्षीय तरुणीने गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. अजयने त्यासाठी नकार दिला. मात्र, लग्न करण्याच्या मागणीसाठी तरुणीकडून वारंवार मानसिक छळ होत असल्याने त्यास कंटाळून अजयने काल मंगळवारी दुपारी तीन वाजता सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.
अजयच्या आत्महत्येनंतर भाऊ मनोज इंगळे यांच्या फिर्यादीवरून तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित तरुणीविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहे.
दरम्यान, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून घरातील तरुण मुलाचा जीव गेल्याने इंगळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.