कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील २९ वर्षीय वाहनचालक करोनासंशयित असल्याचं समोर आलं आहे. त्याला बुधवारी रात्री उशिरा सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. २२ मार्चला तो मुंबईला गेला होता. परदेशातून आलेल्या इचलकरंजीच्या व्यक्तीला त्याने आणले होते. त्यांनतर आता ११ दिवसांनंतर त्याच्यात करोनाची लक्षणे दिसू लागली आहेत.
पालकमंत्री सक्रीय
करोनाच्या संकटास जिल्ह्यात चितपट करण्यासाठी तीन आठवड्यांपासून पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून आहेत. प्रोटोकॉलची झूल आणि पोलिसांच्या बंदोबस्ताचे कवच बाजूला सारून ते स्वत: सक्रिय झाल्याने प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आहे. त्यांच्या कामगिरीमुळे प्रशासनासही चांगले बळ मिळाले आहे. करोनाच्या हद्दपारीसाठी संचारबंदी, सामाजिक अलिप्ततेची काटेकोर अंमलबजावणी करताना, होणाऱ्या गैरसोयींवरून नागरिकांचा संयम सुटणार नाही, अशी दुधारी भूमिका ते प्रमुख अधिकाऱ्यांना विश्वासात घेत कौशल्याने निभावत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times