नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना यांनी संसदेत जे भाषण केले त्यावरून मोठे वादळ उठले असतानाच आज एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत देत विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी परखडपणे आपली मते मांडली आहेत. संसदेत यांच्याबाबत केलेल्या विधानावर अधिक स्पष्टीकरण देतानाच पंतप्रधानांनी काँग्रेसला पुन्हा एकदा लक्ष्य केले. ( )

देशाची आज जी अवस्था आहे त्याला कारणीभूत आहे. अटलजी आणि मी सोडलो तर आजवरचे सगळेच पंतप्रधान काँग्रेसच्या शाळेत घडलेले होते. जातीयवाद, भाषिक वाद, प्रांतवाद आणि भ्रष्टाचार याच्यातच देश इतकी वर्षे गुरफटला असून याला केवळ आणि केवळ काँग्रेस जबाबदार आहे. यातून आपण बाहेर पडलो नाही तर देशाचं किती नुकसान होणार आहे, याचा विचार सगळ्यांनीच करण्याची आवश्यकता आहे, असे म्हणाले. काँग्रेस नेते यांच्यावरही मोदींनी निशाणा साधला. जी व्यक्ती ऐकूनच घेत नाही, संसदेत फिरकत नाही, त्याला मी उत्तर कसे देऊ?, असा सवाल मोदींनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here