जळगाव : जळगाव शहरातील एका तरुणाने प्रेमभंग झाल्याने व्हॅलेंटाइन वीकमधील ’प्रपोज डे’ला त्या तरुणीसमोरच आपल्या हाताची नस कापून घेतल्याने खळबळ उडाली. शहरातील अत्यंत वर्दळीच्या फुले मार्केटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने उपस्थितांपैकी काही जणांनी तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला आहे. (Suicide In Love Affair)

व्हॅलेंटाइन वीक सुरू असताना ‘प्रपोज डे’ला जळगावातील एका तरुणाला तरुणीने नकार कळवला. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने बुधवारी दुपारी २ वाजता शहरातील फुले मार्केटमध्ये ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापली. यावेळी ज्या तरुणीवर त्याचे प्रेम होते ती देखील समोर उभी होती. तिच्याकडे पाहात असतानाच त्याने नस कापल्यामुळे या तरुणीला चांगलाच धक्का बसला.

गावातील २८ वर्षीय तरुणीकडून वारंवार लग्नाची मागणी; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल!

हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान, या घटनेमुळे फुले मार्केट परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here