लंडन, ब्रिटन :

ब्रिटनमध्ये यशस्वी उद्योगपती म्हणून ओळख प्राप्त करणारे व्यापारी शेठ जीवन भारतातील ग्रामीण भागातल्या महिलांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. जीवन यांच्या पुढाकारानं जवळपास ३० हजार महिला कारागिरांना मदत करू शकणारा एक प्रकल्प लवकरच सुरू होतोय.

शेठ जीवन ब्रिटनमध्ये मालमत्ता आणि होम केअर सेवांशी निगडीत व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून वंचित परंतु कुशल महिला कारागिरांना याद्वारे मदत केली जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे महिला कारागिरांच्या हातांनी बनवलेल्या कलाकृती ब्रिटनच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे त्यांना एक नवी बाजारपेठ उपलब्ध होईलच तसंच त्यांच्या उत्पन्न वाढ होऊन या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासही मदत मिळेल.

‘हा प्रकल्प खूप मोठा असून भारतातील सर्व गावं याद्वारे एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. भारतीय महिलांनी बनवलेली पारंपरिक उत्पादनं ब्रिटन आणि जगातील इतर मोठ्या बाजारपेठेत विकली जातील. हा प्रकल्प निश्चितच कारागिरांसाठी फायद्याचा ठरेल तसंच त्यामुळे त्यांना स्वबळावर उभं राहण्यास मदत मिळेल, अशी आशा शेठ जीबन यांनी व्यक्त केलीय.

युक्रेननंतर यूएईच्याही संरक्षणासाठी अमेरिका सज्ज, F-22 लढाऊ विमानं मदतीला धाडणार
कर्नाटक हिजाब वाद : मुस्लिमांच्या दडपशाहीचा कट, पाकिस्तानकडून आगीत तेल
शेठ जीवन यांना गेल्या ३० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. तसंच त्यांना एक समर्पित आरोग्यसेवा व्यावसायिक म्हणून ओळखलं जातं. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात परिचारक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरूवात करून त्यांनी १९९० ते २००५ दरम्यान वृद्धांची सेवेसाठी तीन नर्सिंग होम उघडले. २००६ पासून ते ‘एस्टर हेल्थकेअर आणि प्रॉपर्टी डेव्हलपमेंट’चे संचालक म्हणून जबाबदारी हाताळत आहेत.

‘माझ्याकडे हेल्थकेअर क्षेत्रातील कौशल्य आहे मात्र मी समजाचंही देणं लागतो. गरजू आणि होतकरू लोकांना मदत करण्याची माझी इच्छा आहे. भारतात लवकरच सुरू होणारा हा प्रकल्प माझ्या अनेक आंतरराष्ट्रीय गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. मी मॉरिशसमध्ये एका रिअल इस्टेट प्रकल्पावरही काम करत आहे, इथे एक गृहनिर्माण, हॉटेल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचं काम सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

शेठ जीवन हे १९९० च्या दशकापासून भारत, आफ्रिका आणि पाकिस्तानमधील वंचित मुलांना मदत करत आहेत. त्यांची कंपनी यूकेमधील प्लान इंटरनॅशनल, रेड क्रॉस, अॅक्शन एड, इन एड ऑफ केअर यांसारख्या अनेक कंपन्यांची कॉर्पोरेट प्रायोजक आहे.

‘ह्युंदाई’च्या ‘त्या’ पोस्टवरून गदारोळ; दक्षिण कोरियाची भारताकडे दिलगिरी
खराखुरा हिरो! चिमुरड्याला वाचवण्यासाठी तीन दिवस हातानं खोदली जमीन पण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here