आता शाळा, महाविद्यालयेही पूर्णपणे सुरू झाले आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना एसटी हेच प्रमुख साधन आहे. मात्र संपामुळे विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. आधीच करोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता एसटीच्या संपाची भर पडली आहे. हे असे किती दिवस चालणार असा प्रवाशांचा सवाल आहे. दरम्यान, बुधवारी नागपूर विभागात ७२ बसेसनी २०४ फेऱ्या केल्या. त्याद्वारे महामंडळाला साधारण आठ लाख रुपयांचे उत्पन्न झाले.
ST Strike Update Continues Saying Abhi Nahi To Kabhi Nahi This Is A Failure Of The Government | ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत एसटी संप कायम, हे तर सरकारचे अपयश
नागपूर : गेली तीन महिने होऊनही एसटीचा संप संपत नसेल तर ते सरकारचे अपयश आहे. आता आणखी किती दिवस प्रवाशांनी गैरसोय सहन करायची, असा सवाल प्रवाशी करू लागले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी साधारण दिवाळीपासून कर्मचारी संपावर आहेत. यात चालक आणि वाहकांची संख्या अधिक असल्याने बसेस ठप्प आहेत.