मुंबई : मुंबई विद्यापीठात ‘स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अध्यासन केंद्र’ सुरू करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत क्षेत्रातून नाराजीचे सूर ऐकू आले. हे केंद्र सुरू करण्यापूर्वी मंगेशकर कुटुंबीयांना विश्वासात घेतले नाही. यामुळे मंगेशकर कुटुंबीयांना हा निर्णय मान्य नसल्याचे पत्र मंगेशकर कुटुंबीयांचे निकटवर्ती मयुरेश पै यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना लिहले आहे.

मुंबई विद्यापीठात मंगळवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मुंबई विद्यापीठात ‘स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अध्यासन केंद्र’, तसेच लता मंगेशकर यांच्या नावाने प्राध्यापक चेअर सुरू करणे आणि सुवर्ण पदक प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हा निर्णय घेताना मंगेशकर कुटुंबीयांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. इतकेच नव्हे, तर त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Lata Mangeshkar international school: राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय स्थापन करणार
याबाबत पै यांनी विद्यापीठाला पत्र लिहले असून, यापुढे मंगेशकर कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय लता मंगेशकर यांच्या नावे कोणताही उपक्रम मुंबई विद्यापीठात परस्पर हाती घेऊ नये, अशी विनंतीही यात करण्यात आली आहे. याचबरोबर लता मंगेशकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत कॉलेज’ स्थापन करण्याकरीता मंगेशकर कुटुंबातील सदस्य, तसेच संगीत क्षेत्रातील इतर मान्यवरांची समिती स्थापन केली होती.

या समितीने विद्यापीठातील जागेची पाहणी करून ती जागा शासकीय आंतरराष्ट्रीय संगीत कॉलेजसाठी देण्याबाबत सुचविले होते. परंतु विद्यापीठाने ही जागा कॉलेजला उपलब्ध करून न दिल्यामुळे मंगेशकर कुटुंबीयांचे स्वप्न लतादीदींच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही, याबाबचा खेदही त्यांनी व्यक्त केला.

Hijab Row: ‘आता काय खावे, काय घालावे तुम्हीच ठरवणार का?’; नवाब मलिकांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here