औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध काही संपताना दिसत नाही. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे विरुद्ध रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे असे दोन गट पडल्याची चर्चा शहरात पाहायला मिळत आहे. त्यातच आता मीच मोठा नेता असून, दानवे माझ्याशी बरोबरी करू शकत नसल्याचे विधान खैरे यांनी केलं आहे.
संत एकनाथ रंगमंदिरात पत्रकार परिषदेत बोलताना खैरे म्हणाले की, माझी आणि दानवेची एक लेव्हल नाही. पक्षातील १३ नेत्यांपैकी एक आहे. पक्ष घटनेनुसार ते पद आहे. नेते, उपनेते संपर्कनेते नंतर जिल्हाप्रमुख असा क्रम आहे. त्यामुळे दानवे आणि माझी बरोबरी असण्याचा प्रश्नच येत नाही, असं खैरे म्हणाले. विशेष म्हणजे खैरे आणि दानवे यांच्यात नेहमी कोणत्या न कोणत्या निमित्ताने गटबाजी चव्हाट्यावर येतच असते, आता पुन्हा एकदा तसेच काही पाहायला मिळत आहे. पुण्यातील ओशो आश्रमात आर्थिक घोटाळा, थेट भूखंड विक्रीचा घाट; ईडी चौकशीची मागणी
खैरेंची सत्तारांसोबत हातमिळवणी…
अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये असताना आणि त्यानंतर शिवसेनेत आल्यानंतर ही खैरे त्यांच्यावर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. मात्र दूध संघाच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी आपल्या उमेदवाराच्या पराभवाच खापर अंबादास दानवे आणि संदिपान भुमरे यांच्यावर फोडताच खैरे यांनी सत्तारांसोबत हातमिळवणी केली. तर सत्तार यांनी सुद्धा भावी खासदार म्हणून खैरेंना घोषित करून टाकलं.