औरंगाबाद : मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील गोदावरी नदीवरील पुलाचे रखडलेलं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी नागमठाणसह पंचक्रोशीतील गावकरी जलसमाधी घेण्यासाठी गोदावरी नदीच्या पुलावर चढून बसल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आंदोलनाबाबत गावकऱ्यांनी यापूर्वीच निवेदन दिले होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील गोदावरी नदीवरील पुलाचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहे. या पुलाचा सर्व्हे १९८० झाला. मात्र, प्रत्यक्षात कामाला २००९ साली सुरवात झाली. त्यानंतर पुन्हा काम बंद पडले होते. पण २०१९ ला पुन्हा काम चालू करण्यात आले. पंरतू सध्याच्या स्थितीत पुन्हा काम बंद झाल्याने गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत काम सुरू करण्याची मागणी केली. यासाठी थेट जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.

नोकरभरतीसाठी ‘सीईओं’ची परवानगी सक्तीची

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २००९ साली ५ ते ६ कोटी अंदाजीत रक्कमेत पुर्ण होणारे पुलाचे काम, आजरोजी १२ कोटीच्या पुढे गेले आहे. तर यावर अधिकाऱ्यांना विचारना केली असता ते उडवाउडविची उत्तरे देतात. तसेच भुसंपादनामुळे काम बाकी असल्याचं सांगतात. त्यामुळे भुसंपादन झाले नव्हते तर वर्क ऑर्डर दिलीच कशी असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थितीत केला आहे.त्यामुळे आता गावकरी पुलावर चढून बसले असून, पाण्यात उद्या घेण्याचा इशारा दिला आहे.
ST Strike Update : ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत एसटी संप कायम, हे तर सरकारचे अपयश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here